धक्कादायक! १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रेमसंबंधातून घात झाला! तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल! शेगाव हादरले....

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगावात एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. दरम्यान ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचे समोर आले असून एका तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. 
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगावातील एका तरुणीचे पिंपळगाव राजा येथील अरबाज खान अब्दुला खान या तरुणाशी प्रेमसंबध होते. अरबाज खान याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, तिच्यावर वारंवार मानसिक दबाव टाकला..यातूनच तिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पीडित तरुणीच्या आईने याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी अरबाज खान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...