मुजोर हॉस्पिटल प्रशासनाला उबाठा शिवसेनेने घडवली अद्दल! मलकापुरात ४० हजार रुपयांसाठी ६ तास मृतदेह ठेवला होता अडवून...

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर शहरातील भारत कला रोडवरील हकीमी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ला उबाठा शिवसेनेने अद्दल घडवली. हॉस्पिटल प्रशासनाने ४० हजार रुपयांच्या बिलासाठी तब्बल ६ तास एका रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवला होता..याबद्दलची माहिती शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष हरीश रावळ यांना मिळताच त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरले..हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा इशारा देताच मुजोर हॉस्पिटल प्रशासन नरमले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला..
  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून कमलाबाई यादव इंगळे (६८) यांचे रुग्णालयात ऑपरेशन झाले होते. उपचार सुरू असतानाच आज,९ एप्रिलच्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास उदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले. रुग्णालय प्रशासनाने ४० हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. याबद्दल नातेवाईकांनी शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष हरीश रावळ यांना सांगितली.त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत मृतदेह अडकवून ठेवण्याचा जाब विचारला..
त्यानंतर मृतदेह ताब्यात दिला नाही तर हॉस्पिटलची तोडफोड करू असा इशारा देताच हकिमी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे प्रशासन नरमले. ॲड. रावळ, गजानन ठोसर यांनी मृतदेह उचलून नातेवाईकांच्या ताब्यात दिला..