कॉलेजला गेली पण वापस नाही आली; नांदुऱ्याची संजना कुठे?

 
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यात कॉलेज तरुणी बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने होत आहे. बेपत्ता झालेल्या मुलींचे पुढे काय होते? त्या कुठे जातात ? याबाबत माहिती समोर येत नाही. अल्पवयीन मुली बेपत्ता होता तेव्हा पोलीस गांभीर्याने दखल घेतात मात्र सज्ञान तरुणी बेपत्ता होतात तेव्हा पाहिजे त्या गतीने तपास होत नाही. दरम्यान आता नांदूरा येथील २१ वर्षीय कॉलेज तरुणी गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.. तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संजना श्रीकांत धोटे (२१, रा नांदुरा) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे...

  प्राप्त माहितीनुसार संजना खामगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. २१ फेब्रुवारीला संजना कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र रात्री उशीर झाला तरी संजना घरी परतली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे, संजनाच्या मैत्रिणींकडे चौकशी केली मात्र सगळीकडे शोध घेऊ नये संजना सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संजना बेपत्ता झाल्याची तक्रार केली. संजनाची उंची ५ फूट २ इंच असून वर्ण निमगोरा आणि बांधा सडपातळ आहे. बेपत्ता झाल्याच्या दिवशी संजनाने अंगात मोरपंखी रंगांचा टॉप व पांढऱ्या रंगांची लेगीज घातलेली होती.. या प्रकरणाचा पुढील तपास नांदुरा पोलीस स्टेशनचे अंमलदार इंगळे करीत आहेत...