ती अंगणात उभी होती, तेवढ्यात भामट्याची नजर तिच्यावर पडली अन्....खामगाव तालुक्यातील घटना...

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ४० वर्षीय महिलेसोबत वाईट घडलं.. याप्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.. तक्रारीवरून अनिल दिनकर वखारे(४०) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना खामगाव तालुक्यातील शहराजवळ असलेल्या एका गावातील आहे. हे गाव शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत येते. इथे ४० वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग झाला आहे.. विवाहित महिलेवर अनिल वखारे याची वाईट नजर होती. घटनेच्या दिवशी विवाहित महिला तिच्या घरासमोरील अंगणात उभी होती. महिला एकटी असल्याचे पाहून अनिल वखारे याने वाईट उद्देशाने तिला जवळ ओढली, हात पकडला. अचानक एकाएकी घडलेल्या या घटनेने महिला भांबावली. तिने आरोपीला दूर ढकलून घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर महिलेने कुटुंबीयांसह पोलीस स्टेशन गाठली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे