पाणी आणायला गेली होती, तिथे फक्त हंडाच दिसला! मुलगी कुठे गेली? संग्रामपूर तालुक्यातील निरोडची धक्कादायक घटना...

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील निरोड गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी एकाएकी गायब झाली. मुलगी पाणी आणण्यासाठी नळावर गेली होती..मात्र मुलीचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय जेव्हा पाण्याच्या नळावर पोहोचले तेव्हा तिथे केवळ हंडा दिसला.. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

शेळके
     Advt 👆
 दिव्या गोपाल जाधव असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव आहे. दिव्याच्या वडिलांनी याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार दिव्याचे वडील गोपाल जाधव यांच्या शेताच्या शेजारील शेत संग्रामपूर येथील गणेश रघुनाथ वेरूळकार याने ठोक्याने केले आहे. मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की दिव्या जेव्हा जेव्हा शेतात येत होती तेव्हा तेव्हा गणेश रघुनाथ वेरूळकार हा दिव्याशी बोलत होता. दरम्यान घटनेच्या दिवशी दिव्या नळावर पाणी भरण्यासाठी जाते म्हणून घरून निघून गेली. मात्र बराच वेळ होऊनही दिव्या घरी परतली नाही.
कुटुंबीयांनी नळावर जाऊन पाहिले असता नळावर केवळ हंडाच दिसला. दिव्याच्या वडिलांना गणेश रघुनाथ वेरूळकार याच्यावर संशय असल्याने त्याच्या घरी जाऊन विचारणा केली असता गणेश देखील घरून गायब होता. त्यामुळे गणेश रघुनाथ वेरूळकार यानेच मुलगी दिव्या हिचे किडनॅपिंग केले आहे असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गणेश रघुनाथ वेरूळकार (रा. संग्रामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..