लाज साेडली! ५५ वर्षीय नराधमाचा १६ महिन्यांच्या चिरमुडीवर अत्याचार; जळगाव जामाेद तालुक्यातील गावातील घटना; नराधमास पाेलिसांनी केली अटक..!

 
जळगाव जामाेद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील एका गावातील १६ महिन्यांच्या चिमुकलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना काल ५ ऑगस्ट राेजी समाेर आली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपी नराधमास अटक केली आहे. मधुकर पुंजाजी हागे असे आराेपीचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जळगाव जामाेद तालुक्यातील एका गावात आराेपी मधुकर पुंजाजी हागे याने १६ महिन्यांच्या चिमुकलीला आपल्या घरी नेले. त्यानंतर काही वेळानंतर या चिमुकलीचा रडण्याचा आवाज आल्याने तिच्या आईने तिला घरी आणले. चिमुकलीच्या नाजुक शरीरावर रक्ताचे डाग दिल्याने तिची आई हादरुण गेली. ही बाब समजताच तिच्या आईने थेट पाेलीस ठाणे गाठले आणि आराेपी मधुकर हागेविरुद्ध तक्रार दिली. पाेलिसांनी आरोपी मधुकर पुंजाजी हागे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६५(२) व पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी आराेपी नराधमास अटक केली असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पाेलीस करीत आहेत.