खळबळजनक! पशुवैद्यकीय डाॅक्टरने अंगावर पेट्रोल घेतले पेटवून ९० ते ९५ टक्के जळाल्याने प्रकृती चिंताजनक :पिंपळगाव काळे येथील घटना

 
 जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :पिंपळगाव काळे येथील  पशुवैद्यकीय दवाखान्यातील एका ६८ वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टराने अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना ९ जुलै रोजी उघडकीस आली. यामध्ये पशुवैद्यकीय डाॅक्टर ९० ते ९५ टक्के जळाले असून यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

पिंपळगाव काळे पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉ. चंद्रकांत विश्वासराव अवचार पाटील  रा. जळगाव जामोद यांनी बुधवारी सकाळी निमगाव फाट्याजवळ अचानक अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःला पेटविले. यामध्ये डॉ. चंद्रकांत पाटील जवळपास ९० ते ९५ टक्के जळाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने ओम साई फाउंडेशन च्या रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण केले. यावेळी ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, कृष्णा वसोकार, नांदुरा प्रेस क्लब अध्यक्ष विवेक पाऊलझगडे, विनोदबाप्पू देशमुख, सोपान धोटे, गजानन धोटे, पिंपळगाव काळे सरपंच चौखंडे यांनी तातडीने मदत कार्य करत जखमी विश्वासराव पाटील यांना तातडीने उपचार अर्थ प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.