खळबळजनक..! जिल्हा हादरला..१४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओही केला व्हायरल..खामगाव ग्रामीण पोलिसांनी चौघांना उचलले..

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातून एक अंत्यंत खळबळजनक आणि तेवढीच संताप जनक बातमी समोर आली आहे. एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.. याप्रकरणी पीडित मुलीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला..आतापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी देखील अल्पवयीन आहे.
घटना खामगाव तालुक्यातील एका गावातील आहे. घटनेची संवेदनशीलता आणि पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने आम्ही गावाचे नाळ टाळतो आहोत. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या या गावात ९ मे ते २४ मे या दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. एवढ्यावर आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी या बलात्कार प्रकरणाचा व्हिडिओ देखील शूट केला, आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.


पीडित मुलीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे दाखवून तक्रार दिली. तक्रारीवरून अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी चा किसना उर्फ सुमित सुभाष मुंडे (२०), दादू कुलदीप कवडकार (२०, रा. कदमापूर, ता.खामगाव) , अजय उर्फ सुदर्शन श्रीकृष्ण बघे (२०, कदमापूर) आणि एका अल्पवयीन बालकाला अटक केली आहे. 

खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्हायरल झालेले व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुरावे जप्त केलेले आहेत.. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.. आरोपींवर कष्टात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे..