खळबळजनक..! बुलडाण्याच्या राजुर घाटातील जंगलात आढळला सांगाडा; माणूस की बाई काही समजेना; हत्याकांडाचा संशय...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाण्याच्या राजुर घाटातून धक्कादायक आणि खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी जवळ असलेल्या जंगलातील दरीत एक सांगाडा आढळून आला आहे..या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे..
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार वनविभागाच्या वनमजुरांना हा सांगाडा आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केलेला आहे. हा सांगाडा पुरुषाचा की महिलेचा याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही, मात्र मृतदेहाच्या आजूबाजूला असलेल्या कपड्यांवरून हा मृतदेह पुरुषाचा असावा असा अंदाज असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. या संदर्भात अधिक तपास सुरू असून काही सांगाड्याचे नमुने फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने हे हत्याकांड तर नाही ना असाही संशय आता निर्माण होऊ लागला आहे.. यासंदर्भात बुलढाणा पोलिसांना खोलात जाऊन तपास करण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा मृतदेह कुणाचा, कधीचा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत.