खळबळजनक! ती आठवीत होती तेव्हापासून तिचा उपभोग घेतला, आता होणाऱ्या नवऱ्याला पाठवले न्यूड फोटो..खामगाव तालुक्यातील घटना...!

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ती आठव्या वर्गात होती तेव्हापासून तो तिचा उपभोग घेत होता..तब्बल ५ वर्षांपासून हा प्रकार सुरू होता..त्याने तिचे अश्लील फोटो काढले होते, ते व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार तिच्यावर बलात्कार करत होता..बदनामीच्या भीतीपोटी ती बिचारी हे सहन करत होती..त्यामुळे त्याची हिंमत वाढतच होती..आता ती १८ वर्षांची झाली, घरच्यांनी तिचे लग्न ठरवले..मात्र तरीही तो भामटा तिचा पीच्छा सोडायला तयार नव्हता..त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा नंबर मिळवला आणि त्यावर तीचे न्यूड आणि नको त्या अवस्थेतील फोटो पाठवले..यामुळे तिचे लग्न मोडले..आता मात्र सहनशीलतेचा अंत झाला आणि तिने त्याच्याविरोधात पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.. पोलिसांनी त्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे..

 खामगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे..संबधित गाव हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. पीडित मुलगी २०२० मध्ये ८ व्या वर्गात होती. एक दिवस ती गोठ्यावर जात असताना विजय नावाच्या तरुणाने तिला गाठले. तू माझ्यासोबत फोटो काढ नाहीतर तुझ्या लहान भावाला मारून टाकेल,अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर तिच्यासोबत फोटो काढला , तिचा मोबाईल नंबर घेतला..आणि त्यानंतर तिला फोन करून "तुझे फोटो व्हायरल करेल तुझी बदनामी करेल" अशा धमक्या देऊ लागला. त्यातूनच त्याने पीडित तरुणी सोबत त्याच्या राहत्या घरात, गोठ्यात वेळोवेळी जबरदस्ती शारीरिक संबध ठेवले. तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढले, आणि पुन्हा वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवत राहीला..हा प्रकार तब्बल ५ वर्षे सुरू होता असे पिडीत मुलीने तक्रारीत म्हटले आहे..
होणाऱ्या नवऱ्याला पाठवले फोटो..
दरम्यान काही दिवसां आधी पिढीत तरुणीचे लग्न ठरले. तरीही विजय तरुणीचा पिच्छा सोडत नव्हता. त्याने मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याचा नंबर मिळवला आणि त्यावर मुलीचे नको त्या अवस्थेतील फोटो पाठवले, यामुळे मुलीचे लग्न मोडले. अखेर आता पिडीत मुलीने हिवरखेड पोलीस ठाणे गाठून आपबीती कथन केली.. पोलिसांनी विजयविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे...