खळबळजनक! बातमी वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल! फ्रेंडशिप, लव्ह अन् नंतर सेक्स; मग म्हणे, धर्मांतर केल्यावरच लग्न करीन...! खामगांवची घटना, आरोपी समीर विरुद्ध गुन्हा दाखल

 
खामगाव
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव येथून अतिशय धक्कादायक आणि संताप जनक बातमी समोर आली आहे. मैत्री त्यानंतर प्रेम, लग्नाचे आमिष दाखवून बळजबरी शारीरिक संबंध.. नंतर धर्मांतरण करण्याचा अट्टाहास असा हा संतापजनक घटना क्रम आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी मो. समीर. मो.जमीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी समीर खामगाव येथील जुना फैल भागात राहणारा आहे.
 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील एका २५ वर्षीय तरुणीची समीर सोबत ओळख झाली. दोघेही एकाच ठिकाणी कामाला असल्याने त्यांची मैत्री झाली. काही काळाने समीर ने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, तरुणी देखील त्याच्या प्रेम मोहात अडकली गेली..लग्नाच्या आणाभाका घेतल्या गेल्या. होणारा नवराच आहे म्हणून त्यांच्यात शारीरिक संबंध देखील झाले..विशेष म्हणजे याआधीच तरुणीने एकदा समीर विरुद्ध बलात्काराची तक्रार देखील दिली होती..त्यानंतर लग्न करण्याचे आश्वासन देत समीरने तक्रार मागे घेण्याची अट तरुणीला घातली होती...
अन् घात झाला...
समीरच्या आश्वासनाला तरुणी फसली..ब्रेक अप नंतर दोघांत पुन्हा इश्क झाला. समीर पिडीत तरुणी सोबत ५ - ६ महिने राहिला मात्र तोपर्यंत त्याने लग्न केलेच नाही. पिडीत तरुणी त्याच्याशी लग्नाचा तगादा लावत होती मात्र तो वारंवार टाळाटाळ करीत होता. पिडीत तरुणी वेगळ्या धर्माची असल्याने आधी तू धर्मांतरण कर आणि मग मी तुझ्याशी लग्न करतो असे मो. समीर तरुणीला म्हणाला तेव्हा तरुणीच्या पायाखालची वाळू सरकली..
तरुणीचा धर्मांतराला नकार...
समीरने लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याने तरूणीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. तिने धर्मांतरण करायला नकार दिला आणि ती आईसोबत राहण्यासाठी गेली. अखेर पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून समीर विरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक संजय उदासी करीत आहेत...