खळबळजनक..! बाप लेकावर धारधार शस्त्राने सपासप वार! बापाचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील शेलोडीत रक्ताचा चिखल....

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील शेलोडी येथून खळबळजनक बातमी समोर येत आहे. जुन्या वादातून दोन कुटुंबातील वाद नव्याने उफाळून आला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले..बाप लेकांवर दुसऱ्या कुटुंबातील चौघांनी मिळून हल्ला चढवला..धारदार शस्त्राने सपासप वार केले.. यात गंभीर जखमी बापाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर लेकावर अकोल्यात उपचार सुरू आहेत.लेकाची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे हा थरार घडला आहे. रघुनाथ गाडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा गोपाल गाडे गंभीर जखमी आहे..
प्राप्त माहितीनुसार शेलोडी येथील रघुनाथ गाडे आणि पवन दशरथ बानाईत यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून जुने वाद सुरू होते. या वादातून पवन बानाईत याने रघुनाथ गाडे यांना एखाद्या दिवशी जीवाने मारण्याची धमकी दिली होती..
गाडी लावण्याचे निमित्त झाले अन्..
दरम्यान सोमवारी रात्री घरासमोर गाडी लावण्याच्या शुल्लक कारणावरून दोन्ही कुटुंबातील वाद उफाळून आला. यावेळी पवन बानाईत याने धारदार शस्त्राने रघुनाथ गाडे यांच्यावर सपासप वार केले. वडिलांना वाचवण्यासाठी आलेल्या गोपाल गाडे याच्या पोटातही शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. सदर घटना लक्षात येताच गाडी कुटुंबीयांनी जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झाला तर गोपाल गाडी याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रघुनाथ गाडे यांचा पुतण्या मनोहर गाडे याच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी पवन दशरथ बानाईत, सौ. मनोरमा दशरथ बानाईत, दशरथ आत्माराम बानाईत, मोहन दशरथ बानाईत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.