खळबळजनक! रोहडा येथील पाझर तलावात आढळला मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन....
Oct 12, 2024, 10:33 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी संस्थान जवळच असलेल्या तलावात आज,१२ ऑक्टोबरच्या सकाळी एक मृतदेह आढळला आहे, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार रोहडा येथील तपोवन देवी संस्थान येथे नवरात्र उत्सवानिमित्त यात्रा सुरू आहे. तालुक्यातून शेकडो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात. दरम्यान मंदिर परिसरातून जवळ असलेल्या तलावात आज एका पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह पाण्यावर तरंगला होता..माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. मुतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला, सदर मृतदेह कोणाचा याबाबत अद्याप ओळख पटली नाही. मृतकाचे वय अंदाजे ३५ वर्षे असावे असा अंदाज आहे. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे..