पत्नीवर कैची चालवली! निमगांव गुरु येथील नवऱ्याचा प्रताप! मॅटर पोलिस ठाण्यात..

 
 देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील निमगांव गुरु येथे एका नवऱ्याने बायकोवर कैची चालवली. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली असून पत्नीने मॅटर पोलिसांत नेले आहे..पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   जनावरांसाठी ढेप भिजवली नाही म्हणून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. निमगाव गुरु येथील सारंगधर विठोबा धारे याने दारूच्या नशेत पत्नीवर कैचीने हल्ला केला. पत्नी स्वयंपाक करीत असताना पती दारूच्या नशेत घरात आला.. जनावरांसाठी ढेप का भिजवली नाही या कारणाने शिलाई मशीन वरील कैचीने पत्नीवर वार करून जखमी केले..
  यावेळी पती-पत्नी यांच्यातील वाद सोडवण्यासाठी दिराने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी पतीने दिरालाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. देऊळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल साळवे करीत आहेत..