

स्कूलबस आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक! खूपगावच्या तरुणाचा मृत्यू! येळगाव जवळची घटना
Dec 11, 2024, 10:51 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्कूलबस आणि मोटारसायकलचा अपघात होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आज,११ डिसेंबरच्या सकाळी येळगाव जवळील आश्रम शाळेजवळ ही घटना घडली. अपघातात ठार झालेला तरुण हा बुलढाणा तालुक्यातील खूपगावचा राहणारा आहे.
प्राप्त माहितीनुसार जिवन इंगळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवसाई कॉलेजची बस आणि मोटरसायकलची समोरासमोर धडकून हा अपघात झाला. घटनास्थळी बुलडाणा शहर पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला..