दुःखद..! नको तेच झालं..! गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू! लोणार तालुक्यातील गोत्रा येथील घटना

 
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान काही भाविक पाण्यात बुडल्याच्या दुर्दैवी घटना घडतात. लोणार तालुक्यातील गोत्रा येथे काल रात्री असाच दुःखद प्रकार घडला. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून गेले मृत्यू झाला. अक्षय मसुरकर (१८) असे तरुणाचे नाव आहे. तो मामाच्या गावी देऊळगाव वायसा रहायला होता व लोणी येथे वर्ग १२ वीत शिकायला होता.
 प्राप्त माहितीनुसार अक्षयला पोहता येत नव्हते. गणेश विसर्जनासाठी मित्रांसोबत तो गोत्रा येथील तलावावर गेला होता .तलावावर रात्री अंधार असल्याने ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही. रात्री विसर्जन करून सर्व मित्र घरी आले त्यावेळी अक्षय सोबत दिसत नव्हता. सगळीकडे त्याचा शोध घेऊन तो मिळून न आल्याने गोत्रा येथील तलावावर शोध घेण्यात आला, आज सकाळी अक्षयचा मृतदेहच सापडला. घटनास्थळी पोलीस पोहचले असून पंचनामा सुरू आहे.