दुःखद..! घरातील शॉट सर्किटने घेतला चिमुकल्याचा बळी! लोखंडी अँगलला हात लागला अन् जीव गेला.. संग्रामपूर तालुक्यात हळहळ...!
May 23, 2025, 21:42 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील निवाणा गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरात झालेल्या शॉर्टसर्किटने एका चिमुकल्याचा बळी गेला. प्रणव गजानन उमरकर (१०) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे..
अल्पभूधारक शेतकरी असलेले गजानन उमरकर यांचा मुलगा प्रणव घरात खेळत होता. अचानक लाईट गेली आणि पुन्हा परत आली. खेळता खेळता चिमुकल्याने घरातील लोखंडी अँगलला पकडले..त्यावेळी विजेचा जबर शॉक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे..