नकली सोने दाखवून १०.४६ लाखांची लूट; सात जणांवर गुन्हा दाखल; अमडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना; चंद्रपूर येथून सोने खरेदीसाठी आले होते जानेफळ परिसरात..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नकली सोने विक्रीचे आमिष दाखवून मजूर व कॉन्ट्रॅक्टरला बोलावून त्यांच्यावर हल्ला करून १० लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटल्याची घटना  अमडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चार आरोपींची ओळख पटली आहे.
फिर्यादी राजेश महादेव नगराळे (वय ३८, रा. सास्ती, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) हे मजुरीचे काम करतात. त्यांच्या सहकारी गणेश मडावी यांच्यासोबत त्यांचा बांधकाम कंत्राटाच्या माध्यमातून अजय नावाच्या व्यक्तीशी संपर्क झाला होता. १३ ऑगस्ट रोजी अजयने फोन करून आपल्या शेतात सोन्याची नाणी सापडल्याचे सांगितले आणि ती विकण्याचा प्रस्ताव ठेवला.

१५ ऑगस्ट रोजी अजयने दोन नाणी दाखवली. त्यावर विश्वास ठेवून राजेश व गणेश यांनी १० लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन व्यवहार करण्याचे ठरवले. १८ ऑगस्ट रोजी रात्री ते चंद्रपूरहून कारने (एम.एच. ३४ बीआर ७२२१) निघाले व १९ ऑगस्टच्या सकाळी जानेफळ परिसरात पोहोचले.

इसोली रस्त्यावर अजयने त्यांना नकली सोने दाखवले. व्यवहारात संशय आल्याने दोघे माघारी फिरत असताना अचानक ५ ते ७ अज्ञात व्यक्तींनी तलवारी, कोयते, चाकू घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गणेश मडावी गंभीर जखमी झाले. आरोपींनी १० लाख रुपये रोख, मोबाइल फोन, कारची चावी, घड्याळ व रोख रक्कम असा एकूण १०.४६ लाख रुपयांचा ऐवज लुटून पलायन केले. अशी फिर्याद नगराळे यांनी अमडापूर पोलिस ठाण्यात दिली.

सात संशयितांचा समावेश
या घटनेत इनेश सुभाष पवार, सुभाष पवार (दोघे रा. दधम, ता. खामगाव), जगन शिंदे आणि उमेश शिंदे (दोघे रा. धानोरी, ता. चिखली) अशी नावे समोर आली आहेत. त्यांच्यासोबत आणखी तीन अज्ञात आरोपी असल्याचेही स्पष्ट झाले. फिर्यादीने पोलिसांना आरोपींचे वर्णन सांगितले.
लूटमारीची घटना घडल्यानंतर नगराळे व मडावी या दोघांनी अमडापूर पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या मोबाइलमधील संशयितांचे फोटो त्या दोघांना दाखवले. फोटोंपैकी चार जणांना ओळखून नगराळे व मडावी यांनी त्यांची पुष्टपरिसरा