

पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवून दरोडा; बिबी पोलिसांनी ४ तासांत सत्य समोर आणलं! मॅटर वेगळच निघालं....
Oct 17, 2024, 09:39 IST
बिबी(जयजीत आडे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):१६ ऑक्टोबर रोजी बिबी पोस्टेच्या हद्दीत बीबी ते सुलतानपुर रोडवरील (ए. एस. पेट्रोलपंप) येथे रात्री ०१/३५ वा चे सुमारास अज्ञात चोरट्याने पंपावरील सेल्समन (फिर्यादी) ला चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील ७१५५०/रुपये जबरदस्तीने चोरुन नेल्याची घटना घडली होती. बिबी पोलिसांनी अवघ्या ४ तासांत या गुन्ह्याची यशस्वी उकल केली असून आरोपींना गजाआड केले आहे..
बीबी सुलतानपुर रोडवरील पंपावरील सेल्समनला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील रक्कम लंपास केली. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच ठाणेदार संदिप पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथकाने तात्काळ तपाची चक्र फिरवीत शोध घेवून आरोपी बाळु ऊर्फ विश्वनाथ परसरम तेजनकर वय ३० रा. वाल्हुर ता. लोणार यास ताब्यात घेतले.
आरोपीस विश्वासात घेवून विचारपूस केली असता आरोपीने फिर्यादी सोबत संगणमत करुन पेट्रोलपंपावरील पैसे चोरी करण्यासाठी जबरी चोरीचा बनाव केल्याचे आरोपीच्या चौकशीत निष्पन्न झाले. सदर आरोपी बाळु ऊर्फ विश्वनाथ तेजनकर याचेकडून गुन्हयातील गेलेला माल ७१५५०/- रुपये, गुन्हयात वापरलेले हत्यार, वापरलेली दुचाकी (स्कुटी) तसेच घटनेवेळी आरोपीने ओळख लपवीण्यासाठी वापरलेले कपडे असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोस्टे बिबीचे ठाणेदार सपोनि संदिप पाटील पोलीस अंमलदार परमेश्वर शिंदे, अरुण सानप, नितीन मापारी, यशवंत जैवळ, बद्री कायंदे, अशोक अंभोरे, अरुण माहीते, रविबोरे, आकाश काळदाते यांनी ही कारवाई करून सदर आरोपीस चार तासात अटक करून शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.