BREAKING पैशांपुढे नात फिक्क..!भाऊ भावाचा वैरी! डायरेक्ट खून; कुऱ्हाडीचे वार; शेगाव तालुक्यातील माटरगावात रक्ताचा चिखल;
Jan 17, 2025, 19:06 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिगाव प्रकल्पात गेलेल्या जमिनीमुळे मिळालेल्या पैशातून सख्खा चुलत भाऊ पक्का वैरी झाला. एका सख्या चुलत भावाने दुसऱ्या सख्या चुलत भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे उघडकीस आली आहे.
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे जिगाव प्रकल्प अंतर्गत गेलेल्या शेतीच्या मोबदल्यातील पैशामुळे भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना आज १७ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास माटरगाव येथे घडली आहे. शत्रुघ्न मिरगे असे या मृतकाचे नाव आहे. त्याच्या भावाने दोन कोटीच्या रकमेच्या वादातून शत्रुघ्नचा खून केला आहे. शिवाय या घटनेत दोन महिलाही कुऱ्हाड लागून गंभीर जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी असलेल्या मोनाली भागवत चंडाळाने रा. अकोला, राणी शत्रुघ्न मिरगे रा.वाडी खामगाव यांचा समावेश आहे. दोघींना गंभीर अवस्थेत खामगाव सामान्य रुग्णालयातून उपचारासाठी सिल्वरसिटी रुग्णालयात (खामगाव) येथेदाखल करण्यात आले आहे.जलंब पोलिसांनी याप्रकरणी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले आहे..