बातमी वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल! हॉस्टेलवर शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून करून घ्यायचा गंदे काम; वासनेची भूक भागवण्यासाठी....! पेठ येथील घटना

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वासनेची भूक भागवण्यासाठी एका विकृताने कहर केला. चिखली तालुक्यातील घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आणि समाजाची चिंता वाढवणारी आहे.. शिक्षणासाठी हॉस्टेल वर आई वडीलांपासून दूर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या असहाय्यतेचा फायदा हॉस्टेल वरील अधीक्षकाने घेतला. अवघ्या १३ वर्षीय मुलासोबत अधीक्षकाने गंदे काम केले. विनोद देशमुख असे आरोपी अधीक्षकाचे नाव असून घटना चिखली तालुक्यातील पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील आहे...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत अल्पवयीन मुलगा १३ वर्षांचा असून तो पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील हॉस्टेलवर राहून शाळा शिकतो. तो मुळचा मराठवाड्यातील राहणारा आहे. हॉस्टेल अधीक्षक विनोद देशमुख याने अल्पवयीन मुलाच्या असहायतेचा फायदा घेतला. स्वतःची लैंगिक भूक भागवण्यासाठी विनोद देशमुख मुलाकडून गंदे काम करून घेत होता..वारंवार हा प्रकार सुरू असल्याने घडलेली हकीकत कुटुंबीयांना सांगितली. अखेर पीडित मुलाच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली असून विनोद देशमुख विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे...