BREAKING बुलडाणा शहर पोलिस स्टेशनचे नवे ठाणेदार रवी राठोड यांना आल्या आल्या अपशकून! तिकडे पदभार स्वीकारला आणि इकडे पोलिस कर्मचारी लाच घेतांना रंगेहाथ पकडला; बुलडाण्याच्या कारंजा चौकात खळबळ...

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आजच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची बदली करून त्यांच्या जागी रवी राठोड यांची नियुक्ती करून एसपी पानसरे यांनी केली होती. मात्र नवनियुक्त ठाणेदार रवी राठोड यांना आल्याआलाच अपशकुन झाला आहे..रवी राठोड सायंकाळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारत असतानाच कारंजा चौकात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हेडकॉन्स्टेबलला ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. अनिल कुकडे असे लाचखोर पोलीस हेडकॉन्स्टेबल चे नाव आहे.. थोड्या वेळापूर्वी बुलढाण्यातील वर्दळ असलेल्या कारंजा चौकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे...या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.