११ वर्षीय मुलीवर बलात्कार! धाड पोलिस स्टेशन हद्दीतील घटना....
Jun 22, 2025, 10:38 IST
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :धाड पोलीस स्टेशन हद्दीत संतापजनक घटना समोर आली आहे. एका गावातील ११ वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पीडित मुलीने घाबरून आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी अल्पवयीन आरोपी विरुद्ध धाड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Advt 👆
धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात वास्तव्यास असलेली पीडितेची आई २० जून रोजी दिवसभर कामानिमित्त बाहेर गेलेली होती. कामे आटोपून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्या आपल्या घरी परतल्या, त्यांची ११ वर्षांची मुलगी रडत त्यांच्याजवळ आली. आईने विचारणा केली असता, पीडितेने थरथरत सांगितले की, गावातील एका मुलाने तिला ऑटोरिक्षात ओढून तिच्यासोबत गैरवर्तन केले. आरोपीने तिचा हात ओढून छातीला आणि अंगाला दाबून तिचे कपडे काढले आणि संवेदनशील अवयवांना स्पर्श केला. पीडिता रडू लागताच, 'कोणाला काही सांगितल्यास तुझा जीव घेईन,' अशी धमकी देऊन आरोपीने तिला पळवून लावले.
पीडितेच्या आईने तात्काळ आरोपीची माहिती घेतली. आरोपी हा मूळचा देहड (ता. भोकरदन, जि. जालना) येथील रहिवाशी असलेला व सध्या म्हसला येथे वास्तव्यास असलेल्या साडेसोळा वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाच्या घरी जाऊन विचारणा केली असता, पीडितेने त्याला ओळखले आणि त्यानेच आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. यावेळी विधी संघर्षग्रस्त बालकास जाब विचारला असता, त्याने पीडितेच्या आईस शिवीगाळ करत धमकावले.
पीडितेच्या आईने तात्काळ धाड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन रितसर फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तात्काळ विधिसंघर्षग्रस्त बालकविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. असून विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर केले. पुढील तपास ठाणेदार आशिष चेचेरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे हे करीत आहेत.