घटस्फोटीत विवाहितेवर बलात्कार! खामगाव तालुक्यातील घटना

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील एका गावात घटस्फोटीत विवाहितेवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडीत विवाहितेने याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.. तक्रारीवरून नांदुरा येथील भीम नगरच्या अजय विजय तायडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहिता घटस्फोटीत आहे. पीडित विवाहितेचे काही फोटो आणि व्हिडिओ आरोपीच्या मोबाईल मध्ये होते. ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी अजयने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. तिला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे..
पिडीत घटस्फोटीत विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अजय विजय तायडे याने यांनी दारू पिऊन विवाहितेवर अत्याचार केला.त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हा प्रकार वारंवार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे..