डोणगावच्या 'नॅशनल बार'वर पोलिसांची धाड; जुगार खेळणारे ७ जण अटकेत; ७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त...
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.४० वाजेच्या सुमारास डोणगाव येथील नॅशनल बारमध्ये काही जण अवैध जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष तत्काळ घटनास्थळी छापा मारला. या कारवाईत शेरु अली युसुफ अली शेख रफीक शेख महंमद , शेख अकबर शेख मदन , हुसेन शहा चांद शहा सलीम खाँ खाँजा खाँ गणी शहा लतीफ शहा आणि युसुफ खान दिलदार खान सर्व रा.डोणगाव हे जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी सर्व आरोपींच्या अंगझडतीत व जुगाराच्या डावावरून एकूण ७,२०० रुपये रोख आणि ५२ ताश पत्ते जप्त केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन डोणगाव येथे आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची नोंद पोहेकॉ संजय घिके यांनी केली असून, पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.डोणगाव मध्ये सध्या अवैध धंदे वाल्यांनी व नकली दारु विक्री करणाऱ्यांनी आपले व्यवसाय सुरू केले असून याकडे पोलीस प्रशासनाने अशीच कारवाई करीत मोबाईल वरली घेणाऱ्या वर कारवाई करणे गरजेचे आहे.