BREAKING जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या? केबलने घेतला गळफास; जिल्हा रुग्णालयात रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आहे का?

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज,२३ मे रोजी दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून, गोरगरीब रुग्णांसाठी आधार असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुरक्षितता वाऱ्यावर आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे...
विजय गोविंद इंगळे(३८, रा.सागवान) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार विजय इंगळे यांना दारूचे व्यसन होते, त्यात त्यांची तब्येत खालावल्याने 19 मे रोजी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज २३ मे रोजी रुग्णालयात पहिल्या मजल्यावर  केबलच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  घटनेच्या वेळी वॉर्डातील डॉक्टर, सिस्टर काय करत होते? असा सवाल उपस्थित होत असून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे...