संतापजनक! शिक्षकी पेशाला काळीमा! विद्यार्थिनीवरच वाईट नजर; तुला काय प्रोब्लेम? म्हणत क्लास मध्येच नको ते केले..! जळगाव जामोद येथील घटना

 
 जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात महिला आणि मुली असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विरोधी पक्ष यावरून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत आहे. बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर संबंध महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते. दरम्यान आता शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून समोर आली आहे. इंग्लिश स्पीकिंग शिकवणाऱ्या एका शिक्षकाने क्लास मधील विद्यार्थिनीसोबतच नको ते केल्याची घटना घडली आहे. पिडीत मुलीने याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  तुला काय प्रोब्लेम?

पिडीत मुलगी १७ वर्षांची आहे. मुलीने जळगाव जामोद येथील एका इंग्लिश स्पीकिंग शिकवणी वर्गात शिकवणी लावली होती. दरम्यान काल,२६ सप्टेंबरला मुलगी शिकवणी वर्गाला गेली असता तिच्यासोबत वाईट घडलं..
  आरोपी शिक्षकाचे नाव किशोर पाटील आहे. काल विद्यार्थिनी जेव्हा क्लास मध्ये आली तेव्हा किशोर पाटील याने तुला काय प्रोब्लेम आहे का? असे म्हणत विद्यार्थ्यांच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिक्षकाचा हेतू लक्षात आल्यावर विद्यार्थिनीने कशीबशी सुटका करून घेतली त्यानंतर घडला प्रकार कुटुंबियांना सांगितला. सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत.