संतापजनक! निर्लज्ज बाप! स्वतःच्या मुलीला म्हणे,तुझी मम्मी माझ्याजवळ झोपत नाही,तू माझ्याजवळ झोपायला ये..चुकीचे कामही केले! आता कर्माची फळे भोगावी लागणार.. बुलडाण्याच्या मिलिंद नगरातील घटना
स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे सश्रम करावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मा.आर.एन. मेहेरे यांनी आज,३ ऑक्टोबरला या संदर्भातील निकाल दिला.
घटना १७ जुलै २०१९ रोजीची आहे. घटनेच्या वेळी पिडीत अल्पवयीन मुलीचे वय १० वर्षे ९ महिन्यांचे होते. घटनेच्या दिवशी रात्री ८ वाजता वडिलांच्या रूम मधील लॅपटॉप वर सिनेमा पाहत असताना मुलीला झोप लागली. मुलीचा बाप रात्री उशिरा घरी आल्यावर त्याने मुलीसोबत अश्लील वर्तन केले, मुलीला जाग आल्यावर आरोपी तिथून पसार झाला. पिडीत मुलीची आई मुंबई येथे नोकरीसाठी गेल्याने घडलेली घटना पीडित मुलीने तिच्या काकूला सांगितले, त्यानंतर मुलीची आई मुंबईवरून आल्यानंतर तिला देखील याबाबत सांगितले. मात्र वडील असल्यामुळे सामाजिक बदनामी होऊ नये म्हणून पीडित मुलीने तिच्या वडिलांविरुद्ध तक्रार दिली नव्हती.
हिंमत वाढली..
दरम्यान या प्रकारामुळे नराधम बापाची हिंमत आणखी वाढली. १८ मे २०२० रोजी रात्री अंदाजे १ वाजता नराधम बाप मुलीजवळ आला. तुझी मम्मी माझ्याजवळ झोपत नाही, तू झोपायला ये असे तो मुलीला म्हणाला..नवऱ्याच्या विकृत कारनाम्याला कंटाळून पिडीत मुलीच्या आईने बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दिली. प्रकरण न्यायालयात गेले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री. वसंत भटकर यांनी काम पाहिले, त्यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, तिची आई, मोठी काकू, घटनास्थळ पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी या सर्वांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्याने आरोपीला ५ वर्षाचा सश्रम करावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास चार महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे..