संतापजनक! लाज कशी नाही वाटतं? ५० वर्षाच्या भामट्याचे १२ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे! लोकांनी रंगेहाथ पकडून बेदम ठोकला; सोनाळ्याची घटना....

 
 संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे एक संतापजनक आणि चीड आणणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या थेरड्याने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केले, दुकानात बोलावून तो मुलीशी नको तसे वागत होता..त्याला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले... गावकऱ्यांचा संताप अनावर झाला, आणि त्याला बेदम चोप दिला... आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. 

   गावातील ५० वर्षीय इसमाने दुपारच्या वेळी १२ वर्षीय एका बालीकेचा भरवस्तीत असलेल्या दुकानात बोलवून तिच्या सोबत अश्लील चाळे करीत विनयभंग केला. यापुर्वीही या आरोपीकडून नको ते अश्लील कृत्य पिडीता सोबत करण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून सोनाळा पो.स्टे मध्ये आरोपी ५० वर्षीय रमेश नारायण लहुकार याच्या विरुद्ध कलम ६५(२), ७४, ७५ भा. न्या. संहिता सहकलम ४, ६, ८, १२ बालकांचे लैंगिक अपराघ संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.