संतापजनक! आधी विवाहितेला दाखवले कंडोमचे पाकीट अन् नंतर.... तिच्यासोबत चुकीचं घडलं! मोताळा तालुक्यातील घटना..

 
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशासह राज्यात दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुलडाणा जिल्हा देखील त्याला अपवाद नाही . मोताळा तालुक्यातील एका गावात आज,१२ सप्टेंबरला विवाहितेसोबत चुकीचं घडल. विवाहितेला आरोपीने आधी कंडोमचे पाकीट दाखवलं आणि नंतर नको ते केलं.. याप्रकरणी स्वतः विवाहितेने बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
   पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहितेचे वय २९ वर्षे आहे. सागर पुंडलिक जवरे ( रा. अंत्री, ता.मोताळा ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने विवाहितेला थेट कंडोमचे पाकीट दाखवले.त्यानंतर "करू दे" असे म्हणत शारीरिक संबंधाची मागणी केली. 
  विवाहितेने नकार दिला असता आरोपी सागरने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिला नखाने ओरबडले. विवाहितेने त्याच्या आवडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने दगडाने विवाहितेच्या पाठीवर मारहाण केली असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.