संतापजनक! देऊळगावराजात एकाला अफजलखानाचा पुळका;छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; उद्या देऊळगावराजात हिंदू एकता दर्शन यात्रा..
Oct 5, 2024, 20:37 IST
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगावराजा येथे एकाला अफजलखानाचा पुळका आला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्या भामट्याने आक्षेपार्ह पोस्ट केली. सदरची पोस्ट काही शिवप्रेमी तरुणांच्या पाहण्यात आल्यानंतर पोस्ट करणाऱ्याला काही तरुणांनी समज दिली..३ ऑक्टोबरला हा प्रकार समोर आला, दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी पोस्ट करणाऱ्या शेख रेहान विरुद्ध गुन्हा दाखल केला. शेख रेहान यानेही परस्पर विरोधी तक्रार दिली, त्याच्या तक्रारीवरून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ५ शिवभक्त तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत उद्या देऊळगाव राजा येथे हिंदू एकता दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान शहरातील प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे..
प्राप्त माहितीनुसार देऊळगाव राजा येथील शेख रेहान याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. अफजल खान वधाबद्दल " बेटे ने बाप को धोखे से मारा" असे त्याने लिहिले होते. त्याच्या या कृत्यामुळे काही तरुणांनी त्याला समज दिली होती, शिवाय रेहान विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यादरम्यान रेहान यानेही आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करीत ५ जणांविरुद्ध परस्परविरोधी तक्रार दिली. त्यामुळे "त्या" तरुणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हे खोटे, उद्या हिंदू एकता दर्शन यात्रा...
दरम्यान शेख रेहान याने खोटी तक्रार दिल्याचा आरोप करीत ५ शिवभक्त तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे उद्या देऊळगाव राजा शहरात हिंदू एकता दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता श्री.बालाजी मंदिरातून या यात्रेला सुरुवात होणार आहे...