

एकीकडे निवडणुकीची धामधूम..दुसरीकडे चोरटे सुसाट! मोताळ्यात घरफोडी!साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने दामटले...
Oct 28, 2024, 07:03 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकीकडे निवडणुकीची धामधूम आणि त्यात पोलीस व्यस्त असताना दुसरीकडे चोरटे याचा फायदा घेत आहेत.मोताळा येथे चोरट्यांनी एक घर फोडून जवळपास सव्वापाच लाखांचे दागिने चोरले आहेत. बोराखेडी पोलीस ठाण्यात याप्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
प्राप्त माहितीनुसार मलकापूर रोडवरील अमोल शिवाजी न्हावकर(२७) यांचे घर अज्ञात आरोपींनी फोडले.२६ ऑक्टोबरच्या रात्री ते २७ ऑक्टोबरच्या पहाटेदरम्यान हा प्रकार घडला. चोरट्यांनी घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला.देवघरातील व कपाटात ठेवलेले ५ लाख १२ हजार ३८७ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले..सकाळी ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.