BREAKING चिखलीत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट! आरोपी यश टिपरेची कारागृहात रवानगी....

 
Disha
advt.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश टिपरे याने त्याच्या फेसबुक अकाउंट वर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह फोटो व त्याखाली आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. या पोस्टमध्ये सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता पाहता ठाणेदार संग्राम पाटील यांनी तातडीने ॲक्शन घेत आरोपी यश टिपरे याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने बुलडाणा जिल्हा  कारागृहात त्याची रवानगी केली आहे.

 पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार विष्णू नेवरे, प्रकाश शिंदे, विजय गीते, विजय किटे, राजेश गौंड, सुनील राजपूत यांनी ही कारवाई केली.