“रात्रच नव्हे, दिवसही चोरट्यांचाच!” — मेहकरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; ५० हजारांचा ऐवज लंपास...
अर्ध्या तासानंतर पवार यांच्या पत्नी घरी परतल्या असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती तत्काळ परिसरातील नागरिकांना देण्यात आली.
मेहकर शहरात मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. शिक्षक कॉलनी, पवनसूत नगरसह शहरातील विविध भागांत चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, चोरट्यांना मेहकर पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे पवनसूत नगर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या भरवशावर न राहता स्वतःच गट तयार करून रात्रीचा पहारा सुरू केला आहे. मात्र, आता रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही घरफोड्या होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी मेहकरवासीयांकडून होत आहे.
