मोताळ्याचा हप्ते खाऊ नायब तहसीलदार अँटी करप्शन च्या जाळ्यात! आधी १४ हजार मागितले मग संशय आल्यावर..

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळ्याचा नायब तहसीलदार पक्का खादाड निघाला. वाहनाने मातीवाहतूक सुरळीत करू देण्यासाठी नायब तहसीलदार १० हजार रुपये हप्ता मागत होता आणि पकडलेली गाडी सोडण्यासाठी ४००० रुपये मागत होता.. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नव्हती. म्हणून तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो कडे नायब तहसीलदाराची तक्रार दिली. बुलढाण्याच्या पथकाने सापळा रचला..
पडताळणी कारवाईत पंचासमक्ष नायब तहसीलदाराने १४ हजार रुपये मागितले. मात्र प्रत्यक्ष सापळा रचला तेव्हा नायब तहसीलदाराला संशय आला..त्यामुळे नायब तहसीलदाराने लाच स्वीकारली नाही. मात्र आधी झालेल्या पडताळणी कारवाईत पंचांसमक्ष लाचेची मागणी केली असल्याचे सिद्ध झाल्याने नायब तहसीलदारावर झडप घालण्यात आली. कौतिकराव विष्णाजी रावळकर (५२, रा. छत्रपती नगर धाड नाका बुलढाणा) असे या लाचखोर आणि खादाड तहसीलदाराचे नाव आहे..