मर्डर...! देऊळगावराजा हादरले! जालना रोडवरील ढाब्यावर खूपसा–खूपशी! ३० वर्षीय तरुणाचा खून... दोस्तीत दगाफटका?

 

 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुका पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरला आहे. जानेवारी पासूनच जिल्ह्यात रक्तपाताच्या पत्राच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत..दोन महिन्यांपूर्वी पोलिसाच्या हत्याकांडाने चर्चेत आलेला देऊळगाव राजा तालुका पुन्हा एका घटनेने चर्चेत आला आहे. जालना रोडवरील एका धाब्यावर तरुणाचा खून करण्यात आलाय. मृतक तरुण हा ३० वर्षाचा असून तो जाफ्राबाद तालुक्यातील किन्ही ताठे गावचा आहे..

 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना ३० मे च्या मध्यरात्रीची आहे. सागर डीगंबर डुकरे (३०) हा तरुण त्याच्या काही साथीदारांसह जालना रोडवरील एका ढाब्याजवळ थांबले होते. मध्यरात्रीनंतर त्यांच्यात अज्ञात कारणावरून वाद झाला..
  वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, आरोपी अक्षय कुकडे व अन्य एकाच साथीदाराने सागरवर धारदार शस्त्राने वार केले..पोटात चाकू खुपसून सागरचा खून केला.या खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम घटनास्थळी पोहोचले..त्यांनी देऊळगाव राजा पोलिसांना तपासाचे निर्देश दिले..अवघ्या काही तासांत पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.. देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मृतक सागरच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...