भरधाव दुचाकी रिंगराेडवर आदळली; दाेन जण जागीच ठार; मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यावरील घटना; इंटर चेंजसाठी बनविला आहे रिंगराेड...

 
 मलकापूर पांग्रा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव दुचाकी समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रिंगराेडवर आदळल्याने दाेन जण ठार झाले. ही घटना ३१ ऑक्टाेबर राेजी रात्री ८ वाजता मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यावर हाॅटेल सातबाराजवळ घडली. शेख आरिफ शेख कादर (वय ३५) व शेख अल्ताफ शेख अक्रम (वय २२) अशी मृतकांची नावे आहेत. 
  साखरखेर्डा येथील शेख आरिफ शेख कादर व शेख अल्ताफ शेख अक्रम हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच २८ बीजे ४०२९ ने साखरखेर्डा येथून दुसरबीड येथे रिसेप्शनसाठी जात हाेते. दरम्यान, दुसरबीड येथील हॉटेल सातबारा समोर अंदाज न आल्याने भरधाव वेगातील दुचाकी रिंग राेडवर आदळली.
यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.
सातबारा समोर समृद्धी महामार्गाच्या इंटर चेंज साठी रिंग रोड बनवण्यात आलेला असून तेथे कोणतेच फलक दर्शवणारा नाही. त्यामुळे, वाहन चालकांना रिंग रोडचा अंदाज येत नाही.दरम्यान, या युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचीही चर्चा आहे. पाेलिसात तपासात अपघाताची माहिती समाेर येणार आहे.
घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा येथे रवाना केले. या प्रकरणी वृत्त लिहीस्ताेवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.