

मोटरसायकल ट्रॅक्टरचा अपघात! इसरूळच्या तरुणाचा जागीच मृत्यु, दोघे गंभीर ! कॉलेजला जात होते....
Apr 25, 2025, 18:57 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोटरसायकल आणि ट्रॅक्टरची धडक झाल्याने मोटार सायकल वरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला दर दोन तरुण गंभीर जखमी झाले. आज, २५ एप्रिल ला दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा जालना रोडवरील वाघरूळ फाट्यावर हा अपघात झाला. युवराज उर्फ गोलू रामेश्वर किंगरे ( र. इसरूळ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार युवराजचे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर जालना जिल्ह्यात असलेल्या वाघरूळ येथील एका महाविद्यालयात ऍडमिशन होते.युवराज त्याच्या दोन मित्रांसोबत कॉलेजला जात होता. त्यावेळी भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला यात युवराजचा घटनास्थळीत मृत्यू झाला. नागेश गजानन दिडहाते (इसरूळ) आणि मंगेश गजानन वायाळ ( टाकरखेड) हे दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात युवराज वर इसरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.