भरधाव दुचाकीचा अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी; जामोद गावावर शोककळा...
अपघातग्रस्तांना तत्काळ जळगाव-जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी विवेक व गौरव या दोघांना तपासणीअंती मृत घोषित केले. याबाबत मृतकांच्या नातेवाईकांनी जळगाव-जामोद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी कलम १९४ (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास पो.हे.कॉ. इरफान शेख हे करीत आहेत.
अपघातात दुचाकीवरील राहुल वासुदेव भोपळे हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी खामगाव येथील सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
जामोद शहरातील सर्वांशी मनमिळावू व ओळख असलेल्या विवेक व गौरव या दोघांच्या मृत्यूने गावभर शोककळा पसरली आहे. विवेक भगत यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी व जावई असा परिवार आहे. तर गौरव बांधीरकर हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी, जावई व चार काका असा मोठा परिवार आहे.
कुटुंबाचा आधारस्तंभ ठरलेले हे दोन्ही तरुण एका क्षणात गेल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांवर १० नोव्हेंबर रोजी दुपारी जामोद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
