मिसरूड न फुटलेल्या पोरांची मजनुगीरी! अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवले, म्हणे.."हो की नाही सांग"..! किनगावराजाची घटना...

 
 किनगावराजा (निलेश डीघोळे बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना, छेडखानीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. किनगाव राजा येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, विनयभंग करणारे दोन्ही आरोपी अवघ्या १९ वर्षांचे आहेत तर पिडीत अल्पवयीन मुलगी १६ वर्षांची आहे...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींची नावे प्रतिक दिपक गवई व वैभव परमेश्वर अवसरमोल अशी आहेत. दोन्ही आरोपी सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा येथील राहणारे आहेत. काल,२२ ऑक्टोबर रोजी याप्रकरणाची तक्रार पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात दिली.

पिडीत मुलगी किनगाव राजा येथील एका विद्यालयात ११ व्या वर्गात शिकते. घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुलगी पेपर देऊन बस स्टँड कडे जात होती. त्यावेळी आरोपी प्रतिक व वैभव मोटारसायकलने तिच्याजवळ आले. " तू माझ्यासोबत बोलत जा..हो की नाही मला सांग" असे वाईट उद्देशाने वैभव तिच्यासोबत बोलला. त्याचवेळी मोटारसायकल चालवणारा प्रतिक याने आम्ही तुला पाहून घेऊ अशी धमकी दिल्याचे पिडीत मुलीने तक्रारीत म्हटले आहे..तक्रारीवरून पोलिसांनी प्रतिक आणि वैभव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...