१२ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार! लोणार हादरले...आरोपीला बेड्या

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार लोणार तालुक्यात समोर आला आहे. पीडित मुलीची सुटका आरोपीच्या ताब्यातून करण्यात आली आहे, आरोपीवर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार शहरातील एका महाविद्यालयात १२ व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे २० जानेवारीला अपहरण झाले होते. या प्रकरणाची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी लोणार पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे सुलतानपूर मधील एका वस्तीतून आरोपी तरुणाच्या ताब्यातून पीडित मुलीची सुटका करण्यात आली. त्यानंतर पीडित मुलीचे बयान आणि वैद्यकीय तपासणीच्या नंतर आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरुणाने जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले...