चॉकलेटचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकावर गुन्हा दाखल; भावाला जीवे मारण्याची दिली धमकी, साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या गावातील घटना !

 
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चॉकलेटचे आमीष दाखवून तसेच भावाला जीवे मारण्याची धमकी देवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर 32 व र्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी युवकाविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  रोहित तेजराव गवई याने पीडित अल्पवयीन मुलीस “तुझ्या भावाला मारून टाकेन” अशी धमकी दिली. त्यानंतर तिला चॉकलेट व भेटवस्तू देत जवळीक निर्माण करून लव्हाळा फाटा व कोल्हवड येथे नेऊन दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.फिर्यादी/पीडिता व आरोपी हे एकाच जातीचे असून आरोपी पीडितेचा नातेवाईक आहे. आरोपीने चॉकलेटसह विविध आवडीच्या वस्तू देत मुलीला विश्वासात घेतले. तसेच “भावाला मारून टाकीन” व “मी हात कापून घेईन” अशा धमक्या देत, अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही, दिनांक 03/12/2025 आणि 05/12/2025 रोजी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  06/12/2025 रोजी पीडितेचे वडील यांना आरोपी आणि मुलगी यांच्यातील संबंधांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता मुलीने संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर पीडित मुलगी आई-वडिलांसह पोलिस स्टेशन साखरखेर्डा येथे येऊन तक्रार दाखल केली.या प्रकरणी पिडीत युवतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी रोहित तेजराव गवई याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(फ), 65(1), 68(अ), 351(2), 352, तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) कलम 3, 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सपोनि गजानन करेवाड करीत आहेत.