भरधाव मिनीबस ट्रॅव्हल्सची धडक; युवक ठार, लाेणार ते लाेणी रस्त्यावरील घटना; चालकावर गुन्हा दाखल...

 
 लाेणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव मिनीबस ट्रॅव्हल्सने युवकास जाेरदार धडक दिल्याची घटना लाेणार ते लाेणी रस्त्यावर २९ ऑक्टाेबर राेजी घडली.रमेश काळुराम मरमट (वय ३१)रा. मारोती मंदीर जवळ सोनपवाडी, सिल्लोड छ. संभाजी नगर असे मृतक युवकाचे नाव आहे. 
मिनीबस ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३९ डी ०८०२ च्या चालकाने लाेणार ते लाेणी रस्त्यावरील जांबुल ते देवुळगावं वायसादरम्यान रमेश मरमट या युवकास जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेला रमेश मरमट या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चेतन प्रमोद चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लाेणार पाेलिसांनी मिनीबस ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालकाने वाहन साेडून चालकाने पळ काढला. पुढील तपास लाेणार पाेलीस करीत आहेत.