लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Nov 19, 2025, 11:47 IST
सदर महिला १ ऑक्टोबर २०२५ रोजी घरातील दोन लाख रुपये सोबत घेऊन घर सोडून जालना येथे त्याच्या सोबत गेली. जालना
येथील बुरहान नगर येथे भाड्याने रूम करून दिली. तो अधून मधून तिथे यायचा व तिथे सुद्धा शारीरिक संबंध ठेवायचा मात्र १९ नोव्हेंबर रोजी सदर इसम रूमवर आला तेव्हा त्याला म्हणाले की तू माझ्यासोबत लग्न करणार होता केव्हा करणार आहे.
तेव्हा तो म्हणाला की, तुझ्या सोबत लग्न करायचे नाही तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. माझे लग्न झालेले आहे.
मी पत्नीला सोडून तुझ्या सोबत लग्न करणार नाही,असे म्हणून त्याने मला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.
विवाहितेच्या फिर्यादीवरून ठाणेदार रुपेश श्क्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अंमलदार पोहेकॉ सिद्धार्थ सोनकांबळे यांनी आरोपी शेख अनिस शेख युनूस यांच्या विरुध्द कलम ६४ (१), ३५१(२), ३५२ भारतीय न्याय सहिता कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.
