विक्रीसाठी घरातच साठवला गांजा; माेताळ्यात १६ किलाे गांजा केला जप्त; बोराखेडी पोलिसांची कारवाई; एकास केली अटक, ३.२३ लाखांचा एवज केला जप्त..!
Aug 27, 2025, 15:04 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :विक्री करण्यासाठी घरातच गांजा साठवणाऱ्या एकावर बाेराखेडी पाेलिसांनी कारवाई करीत त्याच्याकडून १६ किलाे १९० ग्रॅम गांजा पाेलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पाेलिसांनी राेहिदास पांडुरंग कपले याला अटक केली असून त्याच्याकडून गांजासह ३ लाख २३ जार ८०० रुपयांचा एवज जप्त केला आहे.
गस्तीवर असलेल्या पीएसआय राजेंद्र कपले यांच्या पथकाला माेताळा शहरात एकाने राहत्या घरातच गांजाचा साठा केल्याची माहिती मिळाली.
पेालिसांनी या माहितीच्या आधारे रोहिदास पांडुरंग मोहिते याच्या घरात धाड टाकली असता त्याच्या घरात ओलसर हिरवट रंगाचा अंदाजे १६ किलो १९० ग्रॅम, ३ लाख २३ हजार ८०० रुपयांचा गांजा मिळून आला.
पाेलिसांनी हा गांंजा जप्त करून माेहिते याला अटक केली. ही कारवाई सीताराम मेहेत्रे यांच्या नेतृत्वात सपोनि. बालाजी शेंगेपल्लू, पोहेकॉ. अमोल खराडे, महिला पोहेकॉ. अनिता मोरे यांच्या पथकाने केली.
याप्रकरणी पीएसआय राजेंद्र कपले यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. बालाजी शेंगेपल्लू हे करीत आहेत.