अटाळीत पकडला गांजा; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची धडक कारवाई; १८ हजारांचा गांजा जप्त; एकास केली अटक...
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला अटाळी येथे एक व्यक्ती चोरीछुप्या पद्धतीने गांज्याची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दि. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास खामगाव नायब तहसिलदार व पंचासमक्ष संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान जीवनसिंग राजाराम पवार (वय ३९), रा. अटाळी याच्या टिनपत्राच्या टपरीवर छापा टाकण्यात आला. झडती घेतली असता त्याठिकाणी विक्रीसाठी ठेवलेला गांजा आढळून आला. सदर गांज्याची अंदाजे किंमत ₹१८,४८० इतकी असून, तो तत्काळ जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाईमुळे अटाळी व परिसरात अवैध अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राची पुसाम करीत आहेत.
