मेहुना राजात तुरीच्या पिकात लावला गांजा; ३.७९ लाखांचा एवज जप्त, एकास अटक; मिशन परिवर्तन’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई...
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, गांजा व तत्सम अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली.
देऊळगाव राजा तालुक्यातील मेहणा राजा शिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान पंच, महसूल राजपत्रित अधिकारी, फोटोग्राफर व वजनकाटाधारकांच्या उपस्थितीत मेहुना राजा शिवारातील गट क्रमांक ३१९ येथील शेतात धाड टाकली. फॉरेन्सिक पथकाच्या बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली असता, तुरीच्या शेतात ठिकठिकाणी ४ ते ५ फूट उंच, हिरव्या रंगाची पूर्ण परिपक्व गांजाची झाडे तसेच सुकलेली गांजाची झाडे अवैधरित्या लागवड करून संगोपन केल्याचे आढळून आले.
या कारवाईत ओली गांजाची झाडे वजन २८ किलो ५१ ग्रॅम (किंमत रु. २,८५,१००/-) व सुकलेली गांजाची झाडे वजन ४ किलो ७०० ग्रॅम (किंमत रु. ९४,०००/-) असा एकूण रु. ३,७९,१००/- किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.या प्रकरणी विष्णु सुखदेव बोरुडे यास १६ डिसेंबर रोजी पहाटे ३.१४ वाजता अटक करण्यात आली. त्याला देऊळगाव राजा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणी पुढील पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वात सपोनि यशोदा कणसे, सहा फौजदार राजकुमार राजपूत, पोहेकॉ. गजानन दराडे, दिनेश बकाले, अनुपकुमार मेहेर, दिगंबर कपाटे, सतीश मुळे, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोना. युवराज राठोड, पोकॉ, मंगेश सनगाळे, मनोज खरडे, चापोहेकॉ समाधान टेकाळे, चापोकॉ. राहूल बोर्ड, विलास भोसले तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
