सोमठाण्यात दिव्यांग तरुणाचा खून! पत्नीशी बोलत असल्याच्या संशयावरून विहिरीत उचलून फेकले...
Apr 26, 2025, 09:05 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन दिवसांपूर्वी चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे एका विहिरीत वैभव पांडुरंग वाघमारे (२८) या दिव्यांग तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी ही आत्महत्या की हत्या अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान तपासांती हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्येचाच प्रकार असल्याचे निष्पन्न झाले आहे. गावातील एका आरोपीने संशयावरून वैभव चा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
वैभव आपल्या बायकोशी बोलतो ,विचित्र वागतो असा संशय गावातील एक आरोपीला होता. २३ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वैभव गावातीलच आरोपीच्या घरी बसलेला होता. त्यावेळी तू माझ्या पत्नीसोबत बोलतो विचित्र का वागतो असा संशय घेऊन वैभवला जिवे मारण्याच्या उद्देशाने टाकले. त्यात वैभवाचा मृत्यू झाला.. या प्रकरणाची तक्रार वैभवचा भाऊ प्रसाद पांडुरंग वाघमारे (२६) याने दिली असून तक्रारीवरून महिलेच्या पतिविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..