दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणावर चाकू हल्ला; खामगाव शहरातील घटना...
Updated: Jun 30, 2026, 14:32 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात घडली. याप्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय भगवान किरकाले (वय ३५) रा. घाटपुरी नाका खामगाव यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की आरोपी अनिरूद्ध भास्कर चंडाळने (रा.जोशीनगर, खामगाव) 28 जूनच्या रात्री अजय हा त्यांच्या मित्रांसोबत घाटपुरी नाका येथे उभा होता. त्यावेळी आरोपी अनिरुद्ध याने अजय कडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. अजयने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर जवळील चाकूने त्याच्या डाव्या हाताच्या बोटावर वार करून जखमी केले. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी अनिरुद्ध चंडाळने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.