पहुरजिरा गावात दाढी कटिंग करणाऱ्या व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; गावात खळबळ

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील पहुरजिरा गावात एका दाढी कटिंग करणाऱ्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, १७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली असून, गावात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रमोद ज्ञानदेव तायडे (वय ४५) या इसमाने घरासमोरील पडीत वाड्यात असलेल्या लोखंडी अँगलला पांढऱ्या दोरीने गळफास घेतला. ही घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद यांचा पारंपरिक दाढी कटिंगचा व्यवसाय करत होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी कैलास महादेव तायडे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलीस ठाण्यात कलम १९४ बीएनएसएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जलंब पोलीस करीत आहेत.